पाच दिवसात तीन वाघ दगावले ; सावली वनपरिक्षेत्रात वाघाचा मृत्यू.

पाच दिवसात तीन वाघ दगावले ; सावली वनपरिक्षेत्रात वाघाचा मृत्यू.


एस.के.24 तास


सावली : सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उपवन क्षेत्रातील कापसी बीट परिसरात आज सोमवार २५ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास गोसेखुर्द नहराच्या बाजूला शेतात  वाघाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.सदर वाघाचा मृतदेह दिसल्याने ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाला दिली.त्यानंतर वनपाल कोडापे सह वनविभागाची चमू लगेच घटनास्थळी दाखल होऊन सदर वाघाचा मृत्यू कसा झाला या संदर्भातून पंचनामा सुरू आहे.


वाघाच्या शवविच्छेदनानंतरच वाघाचा मृत्यू कसा झाला आहे उघडकीस येणार असून या वाघाचा मृत्यूने या परिसरात  खळबळ माजलेली आहे.दरम्यान २१ डिसेंबर रोजी ब्रम्हपुरी वन विभाग येथे,त्यानंतर २४ डिसेंबर रोजी शेतातील विहिरीत वाघाचा मृतदेह आढळला तर आता सावली येथे वाघ मृत मिळाला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !