शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी संपन्न.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी संपन्न.


एस.के.24 तास


चंद्रपूर : तंत्र प्रदर्शनी म्हणजे आपल्याला मिळालेली कौशल्ये सादर करण्याची सुवर्णसंधी.  या संधीचा लाभ घेऊन आपण जो व्यवसाय निवडला आहे त्या व्यवसायाचे उत्तम कौशल्य प्राप्त करून ज्ञानाने,  अनुभवाने समृद्ध व्हा आणि आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा, असे आवाहन एमआयडीसीचे चेअरमन मधुसूदन रूगंठा यांनी याप्रसंगी केले.

     

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय  यांचेद्वारा  आयोजित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे जिल्ह्यातील सर्व शासकीय व अशासकीय औ. प्र. संस्था तसेच अनुदानित अशासकीय एम.सी.व्हि.सी वोकेशनल संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने  जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीचे भव्य आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनीच्या उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  शिक्षणमहर्षी पांडुरंग आंबटकर तसेच जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रवींद्र मेहेंदळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुसूदन रुंगठा होते. यावेळी  प्राचार्य कल्पना खोब्रागडे,  प्राचार्य आर. बी. वानखेडे , प्राचार्य प्रणाली डहाटे,  प्राचार्य डांगे , प्राचार्य किलनाके ,प्रभारी प्राचार्य गेडकर, खाजगी औ.प्र.संस्थेचे  प्राचार्य मोहितकर, शेंडे , वाकडे आदी   संस्थांचे प्राचार्य तथा विविध वोकेशनल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक याप्रसंगी उपस्थित होते.


 कार्यक्रमाचे  प्रास्ताविक गटनिदेशक जितेंद्र टोंगे यांनी केले.  याप्रसंगी पांडुरंग आंबटकर म्हणाले,  कोणतेही कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी मनात जिद्द असावी लागते , ज्याप्रमाणे तुम्ही स्वप्न पहाल,  त्याप्रमाणे कृती योग्य कराल तर ती स्वप्ने कृतीत उतरतात.  आणि त्यामुळे आपण केवळ व्यवसाय प्रमाणपत्र धारकच   न राहता पुढेही उच्च शिक्षण घेत राहावं,  असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांनी तंत्रप्रदर्शनी चा उद्देश आणि भविष्यातील संधी यावर प्रकाश टाकला.


सूत्रसंचालन प्रा. शाम राजूरकर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. अब्दुल रतीब  यांनी करून दिला. आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर यांनी केले .या तंत्र प्रदर्शनीच्या दुसऱ्या सत्रात विजेत्या स्पर्धकांना गौरवचिन्ह  व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे गटनिदेशक बोकडे, रोडे, झाडे , नाडमवार,घटे , कांबळे , रामटेके, गराड,भोंगळे, पाईकराव , साखरकर, मारबते ,दुपारे ,बांबोडे , मार्तीवार,कोठारकर ,भोंगाडे,इरदंडे, लांडगे, फाले,दरवे, जुमडे, पानसे,ढवस , गोबाडे, बोर्डेवार ,भाकरे,मासीरकर , कुळमेथे,शेंडे, आदींनी परिश्रम घेतले.

 

विजेते संस्थांचा गौरव : - 

जिल्हा स्तरीय तंत्र प्रदर्शनीत प्रथम क्रमांक शास. औ. प्र. संस्था ब्रम्हपुरी (मल्टी लेव्हल फार्मिंग युजिंग हायड्रोफोनिक टेक्नॉलॉजी) द्वितीय क्रमांक खाजगी अंबुजा औ. प्र. संस्था ( ‌सोलार व्हेईकल फार फार्म कल्टीवेशन)तृतीय क्रमांक शा. औ. प्र. संस्था ब्रम्हपुरी (एक्सिडेंट प्रिव्हेन्शन रोड सेफ्टी माडेल ) तर बिगर अभियांत्रिकी गटातील प्रथम क्रमांक शा. औ. प्र. संस्था बल्लारपूर यांच्या माडेल तर द्वितीय क्रमांक शास.आदिवासी औ.प्र. संस्था मंगी च्या माडेल ला मिळाला. 


नाविन्यपूर्ण गटातील पारितोषिक शास.औ. प्र . संस्था चंद्रपूर च्या माॅडेल ला मिळाले. प्रोत्साहनपर पारितोषिके शास. औ. प्र. संस्था ब्रम्हपुरी, बल्लारपूर खाजगी औ. प्र. संस्था बामणी, शा.औ.प्र संस्था गोंडपिपरी, शिंदे खाजगी औ. प्र. संस्था मुल या संस्थेनी प्राप्त केला. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रविंद्र मेहेंदळे यांचे हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जिल्हा स्तरीय पुरस्कार प्राप्त दहा संस्थेच्या माडेल ला मुंबई येथे होणाऱ्या राज्य स्तरीय तंत्र प्रदर्शनीत सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याची माहिती यावेळी रवींद्र मेहेंदळे यांनी दिली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !