प्रा.अपर्णा नैताम यांची झाडीबोली च्या नागभीड तालुकाध्यक्षपदी निवड

प्रा.अपर्णा नैताम यांची झाडीबोली च्या नागभीड तालुकाध्यक्षपदी निवड


एस.के.24 तास


चंद्रपूर : साहित्याची जपवणूक व बोलीचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने कार्य करणाऱ्या झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने नागभीड येतील सुप्रसिद्ध कवयित्री, गझलकार प्रा.अपर्णा नैताम यांची नागभीडच्या झाडीबोली साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नुकत्याच मुल येथे पार पडलेल्या पहिल्या महिला झाडीबोली साहित्य संमेलनात याबाबत घोषणा करण्यात आली.


 यावेळी ज्येष्ठ साहित्यिक बंडोपंत बोढेकर, झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष कवी अरूण झगडकर,कवयित्री, शशिकला गावतुरे,महिलाध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर,जिल्हा सचिव लक्ष्मण खोब्रागडे, सरचिटणीस कवी रामकृष्ण चनकापुरे,सुनील बावणे,यांची प्रमूख उपस्थिती होती.

      प्रा.अपर्णा नैताम ह्या डॉ.  बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ,मिंडाळा येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांना वाचन, लेखनाची विशेष आवड आहे. आतापर्यंत त्यांनी चारोळी ,अभंग ,मुक्तछंद वृत्तबद्ध कविता ,गझल प्रकारात लेखन केलेले आहेत. त्यांच्या निवडीबद्दल समस्त झाडीबोली साहित्य मंडळाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !