जो आमदार स्वतंत्र विदर्भाचा बाजुने नसेल त्यांना काळे फासा,गावबंदी करा.मग पहा स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्या शिवाय राहणार नाही.- प्रकाश पोहरे

जो आमदार स्वतंत्र विदर्भाचा बाजुने नसेल त्यांना काळे फासा,गावबंदी करा.मग पहा स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्या शिवाय राहणार नाही.- प्रकाश पोहरे


एस.के.24 तास


गडचिरोली : महाराष्ट्र राज्यात अनेक समस्या आहेत.शेतकऱ्यांच्या समस्या,बेरोजगारांच्या समस्या अलीकडे प्रत्येक जातींना आरक्षण मिळविण्यासाठी जनुकाही चढाओढ सुरु आहे. मोर्चा,आंदोलने होत आहेत.ज्या जरांगे पाटलाना कुणी ओळखत नव्हतं तो जरांगे आज हिरो बनत आहे मराठ्यांना ओबिसीत समाविष्ठ करणे हे काम पाहीजे तेवढ सोप नाही तरीही जरांगे लवत आहेत.


स्वतंत्र विदर्भ राज्याचा लढा नागपूर अधिवेशनात गाजला पाहीजे.जे आमदार विदर्भाच्या बाजुने बोलणार नाहीत,आवाज उठवणार नाहीत अश्या आमदारांना काळ फासुन गावबंदी करा.लढा तिव्र करा स्वतंत्र विदर्भ राज्य मिळाल्याशिवाय विदर्भाचा विकास नाही अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन शेतकरी नेते तथा दैनिक देशोन्नती चे संपादक प्रकाश पोहरे यांनी विदर्भ निर्माण सकल्प यात्रा आंदोलनाच्या समारोपीय कार्यकमाप्रंसगी बोलत होते. 


विदर्भ निर्माण संकल्प यात्रा अहेरी ते गडचिरोली व बोटेकसा ते गडचिरोली भागातून येवून यांचा समारोप इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे करण्यात आला.या प्रसगी विदर्भ राज्य निर्माण समितीचे नेते तथा माजी आमदार अँड.वामनराव चटप म्हणाले की,भरपूर संपतीने नटलेला विदर्भ या विदर्भ राज्याची निर्मीती झालाशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही.माजी आमदार राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी नागविदर्भाच्या माध्यमातून लढा दिला होता. 


हे खरे विदर्भवादी होते.आमचा लढा सुरुच राहणार आहे.देशात व राज्यात भाजपाची सत्ता आहे हे प्रभुचे विर रावणा पेक्षाही निपटार निघाले यांना जाग येत नाही,केंद्र सरकारने निर्णय घेऊन राष्ट्रपती च्या सहीने संसदेत बिल पास करायचा आहे.मग राज्याने,परंतु हे गेंड्याच्या कातड्याचे सरकार मु मे राम बगल मे सुरी वाल्यांना धड़ा शिकवून स्वतंत विदर्भ राज्य मिळवायचे आहे.


 म्हणुन नागपूर अधिवेशनात मोठ्या ताकतीने _ संख्येने ३१ डिसेंबरला जमायचे आहे. अभि नही तो कभी नही. रामनाम सत्य है.हे म्हणण्यासाठी आपण लाखोच्या संख्येनी मोर्चात उपस्थित रहावे असे आवाहनही माजी आमदार चटप यांनी केले. व्यासपिठावर विदर्भाचे अध्यक्ष अरुणभाऊ केदार 'रंजनाताई मामर्डे राजेंद्र ठाकुर,अरुण पाटिल मुनघाटे,घिसु खुणे,शालीक नाकाडे,विलासभाऊ रापर्तीवार,गोपालजी रायपूरे,रमेश भुरसे,नाशिर शेख 'अशोक पोरड्डीवार ' आदि स्थानापन्न झाले होते.कार्यक्रमास कोरची ते सिरोंचा पासुनचे विदर्भवादी प्रामुख्याने बहुसंख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !