हातातील धान जातांना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू.
★ पावसानी झालेल्या शेतपिकाची पाहणी व पंचनामा करून भरपाई द्यावी - राकेश गोलेपल्लीवार ग्रा.पं. सदस्य,सामजिक कार्यकर्ता
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
सावली : सावली तालुक्यात मागील तीन दिवसापासून पाऊस चालू असल्याने शेतात कापून ठेवलेले पिक हातातून हात असल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू येत आहे.वर्षभर मेहनत करून आज पर्यंत सांभाळ करीत शेतकऱ्यांनी श्रम घेतले पण पिक हातात येताच अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे पिकाला झटका बसला आहे.तालुक्यात धान कापणीस जोर असून शेतकऱ्यांना धान बांधनीस मजूरही सापडेना आणि अचानक होणारा बदल यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
सतत तिन दिवपासुन पाऊस सुरू असल्याने अनेक शेतकरी अडचणीत सापडला असल्याने त्वरित शेतीचे पंचनामे करुन अकाली पाऊसामुळे शेतकऱ्यांनची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी. - सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रा.पं.सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे.