राजपूर च्या ग्रामसेवकास निलंबित करा.ग्रा.प.सदस्याची मागणी.

राजपूर च्या ग्रामसेवकास निलंबित करा.ग्रा.प.सदस्याची मागणी.


एस.के.24 तास

 

अहेरी - अहेरी पंचायत सामिती अंतर्गत येत असलेल्या राजपूर पॅच ग्रामपंचायत चे ग्रामसेवक यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे.म्हणुन त्यांच्या कार्यकाळातील झालेल्या कामाची योग्य चौकशी करुन त्यांचेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राजपूर पॅच च्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी,गडचिरोली यांचेकडे निवेदन देऊन केली. ग्रामसेवक दर्रो हे २०२२ पर्यंत ग्रामपंचायत मधे प्रभारी सचिव म्हणुन रुजु झाले होते.ते नेहमीच गैरहजर राहत होते.


 व आपला कारभार नागेपल्ली येथील आपल्या भाडाच्या खोलीतुनच करीत होते. त्यांचा कार्यकाळात त्यांनी अनेक कामे करून गैरप्रकार केल्याचे कळते. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील अवैध कामाची चौकशी करूनच त्यांची बदली करावी अशी मागणी राजपूर पॅच ग्राम पंचायत सदस्यानी मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली यांचेकडे केलेली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !