समाजाच्या गरजा पूरविणारे व समाजाचे समाधान करणारेच खरे शिक्षण. - कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे
★ वार्षिकोत्सव व शैक्षणिक श्रेष्ठता शिष्यवृत्ती वितरण सोहळा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२९/१२/२३ " कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी कष्ट उपसावे लागतात.कष्ट उपसून मोठे झालेल्या व्यक्तीपासून प्रेरणा घ्यायची असते.बेरोजगारी ही समस्या असली तरी आपण समाजाच्या उपयोगी पडलो तर ही समस्या दूर होते.प्रत्येक विद्यार्थ्यांनी विचार करावा की माझी समाजाला काय गरज आहे. ?
कारण समाजाच्या गरजा पूरविणारे व समाजाचे समाधान करणारेच खरे शिक्षण होय " असे बहूमोल मार्गदर्शन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारेंनी केले.ते ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय व शांताबाई भैया महिला महाविद्यालयाच्या वार्षिकोत्सव व शैक्षणिक श्रेष्ठता शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याचे उद् घाटक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने व गोंडवाना विद्यापीठ गीत आणि महाराष्ट्र गीताने करण्यात आली.
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैया होते तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक व ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रविंद्र शोभणे उपस्थित होते.अतिथीमध्ये संस्थेचे सहसचिव अँड भास्करराव उराडे,माजी प्राचार्य डॉ एन एस कोकोडे, प्राचार्य डॉ डी एच गहाणे, उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर,प्राचार्य डॉ एन.वरभे,प्रा.विनोद नरड, पर्यवेक्षक प्रा.आनंद भोयर, वार्षिकोत्सव प्रभारी डॉ तात्याजी गेडाम, डॉ हर्षा कानफाडे, शैक्षणिक श्रेष्ठता पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रभारी प्रा दलेश परशुरामकर,विद्यार्थी संघाचे अध्यक्ष कृणाल नैताम,सुषमा ठुसे,सचिव स्वाती धनविजय समीक्षा पंडीत इ.मान्यवर विचारपीठावर होते.
यावेळी मार्गदर्शक डॉ. रविंद्र शोभणे म्हणाले की,खरे साहित्यिक,कलावंत,कवी खेड्यापाड्यातून जन्माला आले आहेत.खेडयातली बोली अस्सल असते,त्यातून प्रतिभेचा उर्जास्वर आतून येतो,यासाठी डीग्रीची गरज नसते.आपल्याला जे सूचते ते लिहायचे असते.कपडयामुळे व्यक्तिमत्त्व जसे उठून दिसते तसे ज्ञानातून,वाचनातून व्यक्तित्व घडते.
परिश्रमाने माणसं घडतात.तुमच्यात मी उद्याचा कवी पाहतो,लेखक पाहतो.तुमचे वय परिसासारखे आहे, तुम्ही आपल्यातल्या परिसाला ओळखून जीवन सुवर्णाकुंत कराल !,असे मार्मिक विचार त्यांनी व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात अशोक भैया म्हणाले की, विद्यार्थी जीवन हा संघर्षाचा काळ आहे.यात चांगले मित्र व गुरु महत्वाचे आहेत.यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी तुम्ही साध्य करा! असे आवाहन केले.
यानंतर शैक्षणिक श्रेष्ठता शिष्यवृत्ती सहा पुरस्कार शुभांगी दिवटे यांना ,गायत्री कार,कल्याणी लांडेकर यांना चार पुरस्कार आणि सर्व वर्गातील सर्व विषयात प्रथम येणा-या १५० विद्यार्थ्याना सर्टिफिकेट, स्मृतिचिन्ह व ७००००/ रोख रक्कम देऊन पाहूण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.याप्रसंगी महाविद्यालयांतील आचार्य प्राप्त प्राध्यापकांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहूण्यांचा परिचय प्राचार्य डॉ.डी.एच गहाणेंनी केले.संचालन डॉ दर्शना उराडे,प्रा.आकाश मेश्राम,प्रा बालाजी दमकोंडवारांनी तर आभार प्रा.दलेश परशुरामकरांनी मानले.यशस्वीतेसाठी डॉ राजेंद्र डांगे,डॉ रेखा मेश्राम,अधीक्षक संगीता ठाकरे,डॉ असलम शेख,
डॉ धनराज खानोरकर, डॉ रतन मेश्राम, डॉ मोहन कापगते, डॉ किशोर नाकतोडे,डॉ योगेश ठावरी,डॉ भास्कर लेनगुरे,डॉ प्रकाश वट्टी, डॉ पद्माकर वानखडे, डॉ युवराज मेश्राम,डॉ मिलिंद पठाडे,डॉ कुलजित शर्मा,डॉ अरविंद मुंगोले,डॉ अतुल येरपुडे,प्रा.निलिमा रंगारी,प्रा रुपेश वाकोडीकर अशा वेगवेगळ्या समितीच्या अध्यक्षांनी व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.