महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले येथे पार पडला प्रोजेक्टर द्वारे व्यसनमुक्ती जनजागृती.

महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले  येथे पार पडला प्रोजेक्टर द्वारे व्यसनमुक्ती जनजागृती.

अमरदीप लोखंडे, सहसंपादक.


ब्रह्मपुरी : दिनांक,१९/१२/२३ आरोग्य प्रबोधिनी व पेस गट,पुणे चा पुढाकाराने आरोग्य प्रबोधिनी संस्था आणि पेस गट, पुणे द्वारा ब्रह्मपुरी तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगाव भोसले ता - ब्रम्हपुरी  येथे विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीपर व्हिडिओ आणि प्रेझेंटेशन द्वारा जनजागृती करण्यात आली.


 मुख्याध्यापक श्री.मा.ओमप्रकाश एम.बगमारे  यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश गभणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आरोग्य प्रबोधिनीचे कार्यकर्ता प्रितेश जांभुळकर उपस्थित होते.

         

विद्यार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस व्यसनाचे प्रमाण फार वाढत चाललेले असून व्यसन लागण्याचे प्रमुख कारण म्हणजे वाईट मित्रांचे संगत आणि त्यांचा प्रभाव, व्यसनी पदार्थ सहज उपलब्ध होणे, मीडियाचा प्रभाव आणि रूढी परंपरा यासारखे असून ते मानवी जीवनावर खूप वाईट परिणाम पडत आहे. व्यक्ती व्यसनाच्या आहारी जात असून त्याची सवय लागत असते त्यामुळे व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊन त्याला कॅन्सर,उच्च रक्तदाब, क्षयरोग यासारखे आजार होत असून त्याच्या उपचारासाठी खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होत असते आणि त्याच्या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशाप्रकारे व्हिडिओ प्रेझेंटेशन द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून व्यसन सोडविण्याचे उपाय सांगण्यात आले. 

           कार्यक्रमाला उपस्थित  सहायक शिक्षक श्री. मा. मस्के सर,श्री, पुरी सर, महाले सर,घ्यार सर,राजेश क-हाडे सर, मेश्राम सर,गावडकर सर,नाकाडे सर, सडमाके सर, सचिन क-हाडे सर,कु.अंशुल राऊत  , तसेच विद्यालयातील कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !