श्रमदानातून जेष्ठ नागरिकांसाठी विसावा ओठ्याचे बांधकाम. - सरपंच,नंदकिशोर वाढई यांनी केले श्रमदान.
एस.के.24 तास
राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवुन सामाजिक बांधिलकी जपली जाते. त्यामुळेच कळमना हे गाव स्मार्ट ग्राम च्या दिशेने वाटचाल करत आहे. कळमना येथे जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी विसावा मिळावा म्हणून ओठा बांधकाम करण्यात आले. यावेळी कळमनाचे सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई आणि पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, गावातील तरुण युवकानी श्रमदान करून या ओठ्याचे बांधकाम पूर्ण केले हे विशेष.
या प्रसंगी गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते अमोल कावळे, भुषण ताजणे, रमाकांत वाढई, संदीप गिरसावळे,साईनाथ क्षिरसागर,सुरेश आत्राम, रवी वाढई, जेष्ठ नागरिक भाऊराव कावळे, कवडु पा मुठलकर,पुंडलिक मेश्राम यासह गावकरी उपस्थित होते.