गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरीता अधिवेशनात आवाज उठविणार.आमदार डॉ.देवराव होळी ■ हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेतून दिली माहिती.

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरीता अधिवेशनात आवाज उठविणार.आमदार डॉ.देवराव होळी


■ हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेतून दिली माहिती.


एस.के.24 तास - गडचिरोली


गडचिरोली : ७ डिसेंबर पासून राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत असून या अधिवेशनामध्ये आपण गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची मागणी केली असून जिल्हयातील विविध समस्या शासनाच्या निदर्शनास आणून सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आज गडचिरोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे.


यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पत्रकार परिषदेतून माहिती देताना सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल  कॉलेजला मंजुरी मिळाली असून अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोलीच्या नावाने शासकीय जमीन देखील हस्तांतरित करण्यात आली आहे.


त्यामुळे या मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया किमान २०२४-२५ पासून सुरू करावी अशी मागणी  सरकारकडे केली आहे. जिल्हा स्टेडियमचे बांधकाम संथ गतीने चालले असून ते जलद गतीने व्हावे यासाठी नवीन निवीदा प्रक्रिया राबवावी,  झाडे समाज आपल्या मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतल्याने मोठी  समस्या निर्माण झाली असून त्यांच्याही जातीच्या संदर्भात शासनाने निर्णय घ्यावा, बंगाली भाषिक शिक्षकांची पदभरती खुल्या प्रवर्गातून करण्यात यावी, ओबीसींच्या आरक्षण पूर्ववत करण्यात यावे.


जिल्हयात विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, विविध सिंचन योजना, उपसा सिंचन योजना ,प्रशासकीय इमारती, रस्ते पूल इत्यादी विकास कामांकरिता शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा ,  अशीही आपण मागणी केली असून  या अधिवेशनात तारांकित प्रश्न, लक्षवेधी, अर्धा तास चर्चा, औचित्य मुद्दे अशा विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून शासनाला प्रश्न विचारले असल्याचे ते म्हणाले.

 

मार्कंडा देवस्थानचे मागील अनेक वर्षापासून रखडलेले बांधकाम सुरू करण्यात यावे.  हत्ती व वाघाच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्यांच्या  परिवाराला व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत करावी अशीही आपण मागणी केल्याचे ते म्हणाले


यासोबतच आपण जिल्ह्याच्या विकासासाठी  निधीची मागणी केली असून याशिवाय आणखी विविध प्रश्नही उपस्थित करून त्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण या अधिवेशनाच्या माध्यमातून केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.पत्रकार परिषदेला माजी सभापती ईचाळकर,उपसभापती विलास दशमुखे,दिलीप म्हस्के,माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे आदि उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !