बाजारगाव दारुगोळा बनविण्याच्या कारखान्यात स्फोट, ९ ठारव ३ गंभीर जखमी.

बाजारगाव दारुगोळा बनविण्याच्या कारखान्यात स्फोट, ९ ठारव ३ गंभीर जखमी.


एस.के.24 तास


नागपूर : नागपूरजवळील बाजारगाव येथे असलेल्या सोलर एक्सप्लॉसिव्ह कंपनीत स्फोट झाला. या स्फोटात ९ जण ठार,तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.


या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर दारुगोळा तसेच रसायने असल्यामुळे यात मोठी जीवितहानी झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या स्फोटाची तीव्रता नेमकी किती होती याची अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही.पोलिसांचे पथक तेथे पोहोचले असून आतमध्ये पोहोचून स्थिती स्पष्ट होऊ शकेल,अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी दिली.


या स्फोटाचे नेमके कारण समोर आले नसून पोलीस चौकशी करीत आहेत. मृतांमध्ये ६ पुरुष तर ३ महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.


नागपुरातील घटना अतिशय दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस


नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात ६ महिलांसह ९ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे.मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. 


नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः आयजी, एसपी, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना ५ लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे,अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर एक्सवरून दिली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !