पोटेगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन संपन्न.
मुनींश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : दि.06/12/2023 ला.पोटेगाव येथे भिमज्योती नवयुवक बहुउददेशिय मंडळ पोटेगाव च्या वतिने प. पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 67 वा महापरीनिर्वान दिनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.पंकज रामटेके यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन मंडळाचे अध्यक्ष आयु. विजय रामटेके व आयु. देवगळे साहेब भद्रावती यांनी केले तसेच ध्वजारोहन मंडळाचे सचिव आयु.दिवाकर फुलझेले यांनी केले.
आजच्या कार्यक्रमाला आयु.लोमेश कुकुडकार, आयु.ज्ञानेश्वर मुजुमकार,आयु.आदीत्य रंगारी, आयु. गुरुदास रामटेके,आयु.सिद्धार्थ गोवर्धन,आयु. देवाजी बांबोळे,आयु.पंचशिल डोंगरे,आयु. फुलझेले सर, आयु. डोंगरे साहेब सावली, आदी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमात वक्त्यांचे मार्गदर्शन पर भाषणे झाली.