सावली तालुक्यातील खेडी येथे मुली ची ओढणी च्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या.
एस.के.24 तास
सावली : सावली तालुक्यातील खेडी येथे गेल्या तीन महिन्यापासून सदाशिव भडके यांच्या घरी राहत असलेली कु.पुनम राजकुमार शर्मा वय,16 वर्ष राहणार बाबूपेठ या मुलींनी ओढणी च्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
खेडी येथे प्रफुल रामटेके या युवक सोबत ही मुलगी गेल्या तीन महिन्यापासून राहत होती.आज सकाळ च्या सुमारास ती झोपली आहे असे वाटले म्हणून तिला आवाज दिला मात्र कडी आत लावल्याने दरवाजा ला धक्का मारून उघडून पाहिले असते पूनम ने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले.सदर घटनेची माहिती पोलीस पाटील कृपाल दुधे यांनी सावली पोलिसांना दिली.
त्यानंतर सावली पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले व तपास सुरु केले आहे.सदर प्रकरण नेमके काय आहे याची चौकशी पोलीस करणार असून त्या मुलाची चौकशी पोलिसांनी सुरु केलेली आहे.घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी इंगळे ठाणेदार आशिष बोरकर यांनी भेट देऊन पाहणी केली आहे व तपास सुरु असून मृतदेह ला शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.