आयटकचे आंदोलन तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

आयटकचे आंदोलन तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.


एस.के.24 तास - गडचिरोली


 गडचिरोली - आयटक कृती समिती जिल्हा गडचिरोली च्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनिस दि. ४ डिसेंबर पासुन जिल्हा परिषद समोर उपोषणाला बसलेल्या आहेत  त्यांच्या रास्त मागण्या असुन सुध्दा शासनाने अजुनपर्यत मागण्या पूर्ण करीत नसल्यामुळे आता जेल भरो आंदोलन होणार असल्याचे संकेत पुढे येत आहेत. मागण्या अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे व वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. 


2 ग्राज्युएटी बाबत दिलेल्या अंतिम निर्णयाची अंमल बजावणी करणे. 3 मिनि अंगणवाडी केंद्राचे नियमीत अंगणवाडी केंद्रात रुपांतर करावे. ४ आहाराचा दर ८ रु वरून १६ रु. करण्यात यावा. ५ कर्मचाऱ्यांना रजा सवालती व आजारपणाच्या रजा देऊन मेडीकल बिलाची तरतूद करावी. ६ सेवानिवृत झालेल्या कर्मचार्‍यांना सेवानिवृतीचा एकतर्फी लाभ देण्यात यावा.आदि मागण्यासाठी आयटक कर्मचारी उपोषणाला बसले असुन सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात सदर मागण्या पुर्ण कराण्यात अन्यता आंदोलन तिव्र करण्याचा इशारा आयटक संघटनेने दिलेला आहे. 


सदर आंदोलनाचे नेतृत्व आयटक संघटनेचे नेते देवराव चवडे,डॉ. महेश कोपूलवार , अँड जगदिशमेश्राम हे करीत असुन जलील पठाण , सजय वाकडे,प्रणय खोब्रागडे,राधा ठाकरे मिनाक्षी झोडे,सविता कुथे,संगिता चन्ने,रेखा जांभुळे,प्रमिला मने , मिनाक्षी क्षिरसागर,आदि सहीत हजोरा अंगणवाडी सेविका व मदतनीस हजारोच्या संखेनी संख्येनी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !