राजुरा पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल ने भाड्याच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या.

राजुरा पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल ने भाड्याच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या.


एस.के.24 तास


राजुरा : राजुरा पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.


मृत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव श्रीमंत कदम ( ३२) आहे. कदम राजुरा शहरात एका भाड्याच्या घरामध्ये रहात होते.याच घरामध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !