विधानसभेच्या निवडणुकीत तिन्ही राज्यात भाजपाचा विजय गडचिरोलीत जल्लोष. ★ पंतप्रधान मोदी,गृहमंत्री शहा चे आमदार होळीने मानले आभार.

विधानसभेच्या निवडणुकीत तिन्ही राज्यात भाजपाचा विजय गडचिरोलीत जल्लोष. 


★ पंतप्रधान मोदी,गृहमंत्री शहा चे आमदार होळीने मानले आभार.


 सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


गडचिरोली : छतीसगड,मध्यप्रदेश व राजस्थान या तिन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा भरघोष विजय मिळविल्या बाबत इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे विजयाचा फटाके फोडून व नारेबाजी सोबत जल्लोष करण्यात आला. 


याप्रंसगी गडचिरोली विधानसभा चे आमदार डॉ.देवराव होळी म्हणाले की , छतीसगड,मध्यप्रदेश व राजस्थान या तिन्ही राज्यातील विधानसभा निवडणुका भाजप ने भरघोष मतानी विजय मिळविला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शतशहा आभार मानतो. कारण ह्या आमच्या नेत्यांनी फार मोठी मेहनत घेऊन विजय खेचून आणला.


येत्या काळात महाराष्ट्रातही भाजपाचीच सत्ता आल्याशिवाय राहणार नाही.विजयाचा जल्लोष करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष,प्रशांत वाघरे,माजी नगराध्यक्ष,योगीता पिपरे,मुकेश्वर काटवे,दिलीप म्हस्के ,रमेश भुरसे,प्रकाश गेडाम,डॉ.भरत खटी,केशव निंबाळ , सुरेश मांडवगडे,श्याम वाढई,जनार्धन भांडेकर, कविता उरकुडे,लता लाटकर,वर्षा सडमाके,आदि सहीत भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !