अ-हेरनवरगांव महोत्सवात विविध प्रासंगिक वेशभूषणे सजवलेल्या प्रतिकृतीने जनतेला केले मोहित.

अ-हेरनवरगांव महोत्सवात विविध प्रासंगिक वेशभूषणे सजवलेल्या प्रतिकृतीने जनतेला केले मोहित.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक.


ब्रह्मपुरी : दिनांक,१७/१२/२३ अ-हेरनवरगांव येथे वर्षाच्या शेवटच्या डिसेंबर महिन्यात परंपरेनुसार भरविण्यात येत असलेल्या मंडईला बगल देत श्री दुर्गा नाट्यकला  मंडळाने प्रथमच नव संकल्पनेतून सुरू केलेल्या अ-हेरनवरगांव महोत्सवाला आज उद्घाटनिय कार्यक्रमाने सुरुवात झाली.

अ-हेरनवरगांव महोत्सवाचे अध्यक्ष श्री थामदेव जी ठेंगरे सर आदर्श महाविद्यालय,वडसा यांचे अध्यक्षते खाली श्रीअंकुश दुपारे श्री,फेब्रिकेशन वर्क , वडसा यांनी फीत  कापून उद्घाटन केले. तेव्हा अक्षय बांबोळे फर्निचर आर्ट, ब्रह्मपुरी,  बालुजी बेदरे पेंटिंग ठेकेदार,अ-हेरनवरगांव, मूर्तिकार रामू राऊत अ-हेरनवरगांव उपस्थित होते.


अ-हेनवरगांव महोत्सवाचे उद्घाटन पार पडल्यानंतर धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय सलोक्यांची आणि शिवाजी महाराजांचे मावळे यांच्या विविध प्रकारच्या वेशभूषा केलेल्या सजावटीची रथांची रथयात्रा, विविध दृश्यांनी सजवलेली ट्रॅक्टर रॅली,डीजे च्या तालावर ताल- बेताल नाचणारी तरुण,बाल मंडळी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक, गावकरी यांच्या शांततामय निघालेल्या फेरीने गावात उत्साहाचे वातावरण तयार झाले.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अ-हेरनवरगांव चे मुख्याध्यापक देवानंद तुलकाने, पातोडे सर, मुन सर, खरकाटे सर ,नीता गजघाटे मॅडम, निकुरे मॅडम यांनी अथक परिश्रम घेऊन शालेय बाल मुलां मुलींच्या वेशभूषा,केशभूषा करून हुबेहूब थोर महात्मे, संत यांच्या साक्षात प्रतिकृती तयार करून गावकऱ्यांची मने जिंकली.


महोत्सवाच्या निमित्याने खेड्यापाड्यातून विविध प्रकारच्या दुकानांची दुकानदारांनी दुकाने थाटली आणि गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. गावकरी आणि बाहेरगाव वरून येणाऱ्या पाहुण्यांचे मनोरंजन करण्याकरिता श्री दुर्गा नाट्यकला मंडळाने " भाग्यलक्ष्मी " या नाटकाचे आयोजन केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !