महाराष्ट्र बँक शाखा चिमुर येथील खातेदारांच्या खात्यातुन दुसऱ्याच्या खात्यात १ लाख गेले.
■ दिव्याग काळे यांची तक्रार.
एस.के.24 तास
चिमुर : बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखा चिमुर येथील एका खातेदाराचा खात्यातील एक लाख पाच हजार रुपये दुसऱ्याच्या खात्यात गेल्याने खातेदारामधे एकच खळबळ उडाली. सदर बॅकेतील खातेदार अरुण शिवराम काळे , सूर्यकांत काळे यांचे सयुक्त खाते क्रमांक 6 o3 23 4 26 28 6 असे असुन त्यांच्या खात्यात जमा रूपये १लाख १७ हजार रुपये होते. त्या पैकी १ लाख ५ हजार रुपये कुणीतरी काढले कारण खातेदार जेव्हा बँकेत पैसे काढण्याकरीता गेला असता सदर बाब लक्षात आली.
सदर बॅकेतील मॅनेजर याचेकडे तक्रार केली असता ग्रामीण महिला पतसंस्था चिमूर चे व्यवस्थापक प्रणय हजारे यांच्या खात्यात ६४ हजार ४९० रुपये जमा झाले. उर्वरीत दर्शना गायकवाड , अनिकेत येसासरे , सिमा सातेसैल व इतरांच्या खात्यावर ४० हजार गेलेत. महत्वाची बाब म्हणजे खातेदार काळे कडे AT M' phone pay असे काहीही नाही. मोबाईल चेक करण्यात आले. यावरून हि बॅकेची चुकी आहे.
म्हणुन अरुण काळे यांनी पोलीस स्टेशन चिमुर येथे दि. २१ डिसेंबरला रिपोर्ट दर्ज केला असता प्रणय हजारे कबुल झाला. माझ्या खात्यात ६४ हजार जमा झाले परंतु मी खर्च केल्यामुळे दोन _ तिन दिवसात पैसे परत करतो असे आश्वासन खातेदारास दिले. बाकीच्या व्यक्तीचा पत्ता सापडला नाही. अश्या प्रकारे झालेली घोडचूक बॅक व पोलिसांच्या सहकार्याने सुधरविण्याचा आटापिठा सुरु असुन खातेदारांचा जिव भांड्यात आला आहे.