सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
सावली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक आणि भौगोलिक विविधतेच्या भारत देशाला एकता, समता,बंधूतेच्या सूत्रात बांधण्याचे,देशाची सार्वभौमता अखंडित आबाधित ठेवण्याचे काम केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला " शिका,संघटित व्हा,संघर्ष करा " हा संदेश आचरणात आणून भारतीय राज्यघटनेच्या संरक्षण,संवर्धनासाठी प्रतिबद्ध होणं हेच त्यांना खरं अभिवादन ठरेल..! बौद्ध समाज,मोखाळा वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हरपुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपासक,प्रफुल दुधे,गिरीधर शेंडे,सचिन दुधे सचिव,रवीन्द्र रायपुरे,आनंदराव गोवर्धन,सोनल गोवर्धन,नरेश शेंडे,महेश रायपुरे,स्वप्नील बारसागडे,संचालक,महेंद्र गोवर्धन,उपासिका,विपरनता शेंडे,कल्याणी डोंगरे, जिवनकला शेंडे,सपना लाकडे,सुजाता दुधे,शालु डोंगरे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.