सरपंच,तमुस अध्यक्ष,काही महिलांना रेती तस्करांचा जीवघेणा हल्ला.

सरपंच,तमुस अध्यक्ष,काही महिलांना रेती तस्करांचा जीवघेणा हल्ला.


एस.के.24 तास


गोंडपिपरी : रेती तस्करीसाठी जेसीबी व पोकलेन नदीघाटात टाकायला मनाई केल्याने गुंड प्रवृत्तीच्या रेती तस्करांनी गावकऱ्यांवर चाकू व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला.या हल्ल्यात सरपंचासह महिलांना मारहाण करण्यात आली असून तारडा चे सरपंच तरुण गंगाराम उमरे,तंटामुक्त समिती अध्यक्ष चंद्रशेखर सुधाकर लखमापुरे हे गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना 


गोंडपिपरी तालुक्यातील " कुलथा " रेती घाटावर रात्री १ वाजता च्या सुमारास घडली.गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा रेती घाटासह अनेक रेती घाटावरून रात्रीच्या सुमारास जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने ट्रॅक्टरने रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.रेती तस्करांकडून दादागिरी करत रेती उपसा सुरू आहे.


नदीपात्रात जेसीबी,हायवा,पोकलेनचा वापर करू नये यासाठी सरपंच,तमुस अध्यक्ष यांच्यासह काही महिलांनी रेती घाटावर धडक दिली असता,शाब्दिक वादानंतर मारहाणीत रूपांतर झाले.रेती तस्करांनी लोखंडी रॉड व धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला.त्यानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले.तक्रारीनंतर पोलिसांनी जीवघेणा हल्ला,बेकायदेशीर जमाव केल्या प्रकरणी तिंघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


साहिल सय्यद,वैभव पेचे रा.चंद्रपूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले एक आरोपी फरार आहे. पुढील तपास ठाणेदार,जीवन राजगुरू, पीएसआय मोगरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !