ब्रम्हपुरी- खेड रोड वर आढळला युवकाचा मृतदेह ; पोलिस तपासात हत्या झाल्याचे निष्पन्न.
★ अवघ्या काही तासात एका आरोपीस अटक.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : दिनांक,१०/१२/२३ ब्रम्हपूरी पासून अवघ्या काही मीटरवर असलेल्या ब्रह्मपुरी ते शिवाजीनगर - खेड रोडवर उपवनसंरक्षक यांच्या शासकीय निवासस्थानासमोर
आज सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळल्याने ब्रम्हपुरी शहरात व आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली.सदर युवक हा कहाली येथील रहिवासी असून मृतक मुलाचे नाव पवन गुरुदेव धोटे असून तो बांधकाम मिस्त्री असल्याचे समजते.
मृतक युवकाने काल सायंकाळी आपल्या घरी उशिरा येणार असल्याचे आपल्या मित्राच्या भ्रमण ध्वनी वरून सांगितले परंतु तो घरी परत गेलाच नाही.त्यामुळे शंकांना देव फुटले.
युवकाचा घात की अपघात....? ब्रह्मपुरी पोलिसांनी सखोल चौकशी केली असता ज्या मित्राच्या भ्रमण ध्वनी वरून घरी सांगितले त्याच मित्राने त्याची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
आरोपी रवी साहारे कन्हाळगावं ह्यास 302 कलमान्वये अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सदर प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्याकरीता ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे नेले.यावेळी घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.दिनकर ठोसरे आणि पोलिस निरीक्षक श्री.अनिल जिट्टावार हे आपल्या चमू सोबत हजर होते.