मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन तर्फे स्वयंसेवक दिन संपन्न.
एस.के.24 तास
चामोर्शी : आज दिनांक 5 डिसेंबर 2023 रोज मंगळवारला मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन तर्फे गणपुर रै गावामध्ये स्वयंसेवक दिन साजरा करण्यात आला. त्यामध्ये गावातील युवकयुवती सहभागी झालेत त्यामध्ये त्यांची कार्यशाळा घेण्यात आली. स्वतःमध्ये असलेल्या क्षमता आणि उणिवा यांची जाणीव करून स्वतःचा सर्वांगीण विकास कसा घडवून आणता येईल तसेच गावातील समस्या कशा सोडवू शकतो हे कार्यशाळेच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आले. आणि आपण स्वतः गावात एक स्वयंसेवक म्हणून कशा पद्धतीने काम करू शकतो याबद्दल गावातील युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे तालुका समन्वयक योगीता सातपुते युवा मार्गदर्शक पंकज शंभरकर, अश्विनी उराडे, अस्मिता उराडे समुदाय समन्वय जय राऊत आणि गावातील युवकांनी सहकार्य केले.