शिवसेनेची पीकविमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड,कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की.

शिवसेनेची पीकविमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड,कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की.


एस.के.24 तास


चंद्रपूर : जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी व पूरामुळे सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पिकविमा काढल्याने ओरीऐंटल इन्शुरन्स कंपनीला पिकांच्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील ४७ हजार शेतकऱ्यांना २४ कोटी रूपये वितरीत करणे आवश्यक होते. मात्र, कंपनीने केवळ ११ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ ५ कोटी रूपये वितरीत केल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कंपनीचे कार्यालय गाठत कार्यालयातील खुर्च्या, संगणक, प्रिंटर, टेबलाची तोडफोड केली आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांशी धक्काबुकी करण्याचा प्रयत्न केला.


जिल्हयात चालू खरीप हंगामात सोयाबीन पिकावर किड व रोगाचा व्यापक प्रमाणात प्रादुर्भाव होवून पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या तरतुदीतील हंगामातील प्रतिकुल परिस्थिती या जोखमेच्या बाबीअंतर्गत अधिसूचना लागू करण्यात आली होती.


 त्यात ४६ हजार ९९२ शेतकऱ्यांचा समावेश असून ओरीऐंटल इन्शुरन्स कंपनीने अग्रीमासाठी २३.८० कोटी रुपये मंजुर केले आहे. आतापर्यंत ११ हजार २७७ शेतकऱ्यांना ४.९४ कोटी रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. तर उर्वरीत रक्कम जमा करण्याची कार्यवाही कंपनीमार्फत सुरू होती.


 ४ डिसेंबर २०२३ सोमवारला शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी कंपनीचे कार्यालय गाठत पिकविम्यांचे पैसे अद्याप का दिले नाही म्हणत कार्यालयातील संगणक,प्रिंटर,टेबल,खुर्ची व इरत साहित्यांची तोडफोड केली.तात्काळ शेतकऱ्यांना पिक विमा द्या अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला.दरम्यान कंपनी प्रशासनाने वृत्त लिहित्तोवर पोलिस ठाण्यात तक्रार दिली नसल्यामुळे कोणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !