महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव (भो) येथे अपूर्व विज्ञान मेळावा तथा विविध कार्यक्रमाचे आयोजन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१७/१२/२३ ब्रह्मपुरी पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव, भोसले विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा तथा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री ओमप्रकाश बगमारे सर तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच श्री जगदीश बनकर ,पालक संघाचे उपाध्यक्ष श्री जितेंद्र राऊत, श्री हेमराज कामडी, श्री सुरेश आडकिने,अंबर फुलबांधे,मस्के सर, महाले सर,राजेश क-हाडे सर, नाकाडे सर,इतर सदस्य,विद्यार्थ्यांचे आजी - आजोबा , पालक वर्ग उपस्थित होते.
सर्वप्रथम भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम व भाभा अनुसंशोधक शास्त्रज्ञ सी .व्ही. रमण यांच्या प्रतिमांना अभिवादन करून अपूर्व विज्ञान मेळाव्याचे पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
पाहुण्यांनी व विद्यार्थी आणि पालकांनी विज्ञानाच्या प्रतिकृती यांचे अवलोकन करून त्यांचे भविष्यातील महत्त्व जाणून घेतले आणि विज्ञान प्रतिकृती तयार करणाऱ्या भविष्यातील वैज्ञानिकांचे अभिनंदन करून भविष्यातील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या माय स्कूल डायरी चे बक्षीस वितरण पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात शाळा ,आई-वडील, गुरुजन, यांच्या बद्दल डायरीमध्ये माहिती देऊन व इतर घटकांचा वापर करून उत्कृष्ट कलाकृती वापरून डायरी तयार करण्यात केली. डायरी तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गणीहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.
याच कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांचा मेळावा घेण्यात आला.जवळपास ७०ते ८० आजी-आजोबां मेळाव्याला उपस्थित होते.
आजी-आजोबाची प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली . मेळाव्याला उपस्थित आजी आजोबांनी आपल्या पारंपरिक अभंग लोकगीत,दळण दळताना जात्यावरची गाणी गायन करुन आपल्या नातवाला पारंपारिक गितांची आठवण करून दिली. अपूर्व विज्ञान मेळाव्याचे औचित्य साधून वर्ग पाच ते आठ चा प्रथम सत्र परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री पुरी सर यांनी केले तर आभार सडमाके सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री मेश्राम सर, सचिन क -हाडे सर ,गावडकर सर,घ्याल सर, अंशुल राऊत मॅडम व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले .