बामसेफ चे महाअधिवेशन २४ ते २८ डिसेंबरला नागपुरात.

बामसेफ चे महाअधिवेशन २४ ते २८ डिसेंबरला नागपुरात. 


एस.के.24 तास - गडचिरोली


गडचिरोली : भारतातुन १० लाख कार्यकर्त्याची व्यवस्था. कान्हेकर सर. गडचिरोली _ भारत मुक्ती मोर्चा व बामसेफ संघटनेचे महाअधिवेशन दि. २४ ते २८ डिसेंबर २०२3 पाच दिवसीय महाअधिवेशन पारडी , भंडारा रोड नागपूर येथील भव्य पटांगणात आयोजीत करण्यात आलेले असुन संपूर्ण भारततुन जवळपास १० लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार असुन त्यांची प्रत्येक राज्यातील कार्यकर्ते अशी कार्यक्रमात बसण्याची , जेवण्याची व राहण्याची व्यवस्था केली.


 जाणार असुन अश्या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या तयारीला नागपूर चे कार्यकर्ते कामाला लागले असुन प्रत्येक जिल्हयातील कार्यकर्ते पोस्टर , भिंतीपत्रके ' प्रचार सुरु असुन गडचिरोली जिल्ह्यातील जवळ्पास १० हजार कार्यकर्ते जाणार असुन तस्या प्रकारचा प्रचार सुरु असल्याची माहीती बामसेफ गडचिरोली जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर यांनी दिली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे राहणार असुन त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. 


तसेच उदघाटक म्हणुन सिने कलाकार डॉ. मुरली बोम्माक,हैद्राबाद तर प्रमुख अतिथी मनोज जेगडी नेपाल,भुतपूर्व सांसद राजकुमार सैनी हरियाना , डॉ. विलास खरात , महासचिव भारत मुक्ती मोर्चा आदि लाभणार आहेत. तरी होवू घातलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हा प्रचार प्रमुख भोजराज कान्हेकर ' प्रमोद राऊत , जनार्धन ताकसांडे , नितिन पदा , मनोज खोब्रागडे, शंकर आलोणे , दिलीप नंदेश्वर , प्रमोद बांबोळे , शेंन्डे सर जनबंधू सर , डोमाजी गेडाम ,आनंद आलोणे , डॉ. उज्वला शेन्डे , कल्पना लाळे , लिना ढोलणे , ज्योती आत्राम, आदि प्रचार कार्य करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !