वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार : मुल तालुक्यातील जाणाळा येथील घटना.

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार : मुल तालुक्यातील जाणाळा येथील घटना.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल :  मुल तालुक्यातील जानाळा गावातील शेती कामासाठी शेतावर गेलेल्या शेतकर्‍यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज उघडकीस आली.सुभाष कडते मु.जानाळा वय,४०असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.


ही घटना कक्ष क्रमांक 523 मध्ये घडली. या घटनेची माहिती आणि बघायला होतास त्यांनी पोलिसासह घटनास्थळ गाठून पंचनामा करण्यास सुरू केले आहे.सुभाष कडते काल आपल्या शेतात शेतीकामाकरिता गेला होता. मात्र तो परत आला नाही. त्याचा शोध घेतला असता आज सकाळी छिन्नविछिन्न अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. 


वाघ त्याचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले.मृतक सुभाष चे मागे त्याची पत्नी व मुलगी असा परिवार आहे.घटनेची माहिती वनविभागाचे अधिकारी व पोलिसांना देताच वनपरिक्षेत्र अधिकारी आर.कारेकर क्षेत्र सहाय्यक ओमकार थेरे व पोलीस निरीक्षक सुमित परतेकी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !