कै.सीताराम पाटील मुनघाटे हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय,काटली येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिन.
एस.के.24 तास
गडचिरोली : कै.सीताराम पाटील मुनघाटे हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय,काटली येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दीना निमित्ताने विनम्र अभिवादन. करताना सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पी.एम .राऊत .यांनी सर्वप्रथम प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांना संविधानाबाबत माहिती देऊन त्यांचे अधिकार व हक्क काय आहे.
तसेच शैक्षणिक,सामाजिक,राजकीय,कार्याची माहिती दिली.तसेच शिक्षक वृंदांनी बाबासाहेबांच्या जीवनावर त्यांच्या कार्याची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली.
विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला श्री.कोटांगले सर,श्री पराते सर,श्री. ताटेवार सर,श्री .बोधलकर सर,तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. कु.संगीता मेश्राम यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि कु.आचल मुनघाटे यांनी आभार प्रदर्शन केले.