व्याहाड बुज.येथील ग्रामसभेमध्ये गदारोळ.
एस.के.24 तास
सावली : सावली तालुक्यातील व्याहाड बुज.येथे दिनांक 26 डिसेंबर रोजी ग्राम सभेमधून आशा वर्कर निवड करणे बाबत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते.मात्र येथील ग्राम सभेमध्ये गदारोळ झाल्यामुळे ग्रामसभा तहकूब करण्यात आली.
सावली तालुक्यातील व्याहाड बुज.हे गाव लोकसंख्येने 5000 च्या वरील लोकसंख्या असून या ठिकाणी शाळा,बँक,प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना,सेवा सहकारी संस्था,असे बरेचसे शासकीय कार्यालय आहेत.आज च्या ग्रामसभेमध्ये गावाची लोकसंख्या बघून चौथी आशा वर्कर निवडण्यासाठी येथील ग्रामपंचायत ने आज दिनांक 26 डिसेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते.
सदरच्या ग्रामसभेमध्ये गावातील एकूण 24 महिलांचे अर्ज प्राप्त झाले होते . मात्र ग्रामसभेमध्ये विषय ठेवताना ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव यांनी 24 अर्ज ग्रामसभेमध्ये न ठेवता फक्त तीनच अर्ज ग्रामसभेमध्ये ठेवण्यात आले.ग्राम सभेमध्ये जवळपास 1000 च्या वरती महिला व पुरुष यांची संख्या होती.
24 अर्ज ग्रामसभेमध्ये आशा वर्कर साठी प्राप्त झालेले असताना ही येथील ग्राम सभेमध्ये फक्त तीनच अर्ज ठेवल्यामुळे लोकांनी ह्या ग्रामसभेत आशा वर्कर साठी 24 ही अर्ज ठेवण्यात यावे आणि ग्रामसभेमधूनच आशा वर्कर त्यांची निवड करण्यात यावी असा तगादा लावला . जवळपास ही चर्चा दुपारी १२:०० वाजे.पासून तर सायंकाळी ५:०० वाजे.पर्यंत चालली.
मात्र येतील ग्रामसेवक यांनी नियमाप्रमाणे मी तीनच अर्ज ग्रामसभेमध्ये ठेवेन असं निर्णय घेतल्यामुळे त्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांचा पारा भडकून गदारोळ व्ह्यायला सुरवात झाली.शेवटी यावर काही तोडगा न निघाल्यामुळे येतील ग्रामसेवक,मसराम यांनी सायंकाळी ५:०० वाजता सभा तहकूब करून समोरील निर्णय साठी वैद्यकीय अधिकारी सावली यांचे स्तरावरून आशा वर्कर ची निवड करण्यात यावी असे मत नोंदवून सभा रद्द केली.
प्रतिक्रिया...
आशा वर्कर ची निवड ही ग्रामसभा मधूनच घेण्यात यावी.शासकीय अधिकाऱ्यावर हे सोपवू नये. - माजी सरपंच सौ.वंदनाताई अनिल गुरनुले
ग्राम सभेमधूनच व्याहाड बुज.येथील आशा वर्कर ची निवड करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल. - कृष्णा वाढई सामाजिक कार्यकर्ता बुज.
ग्रामसभेमधून आशा वर्कर ची निवड न झाल्यास आमरण उपोषण ला बसणार. - अनिल गुरनुले सामाजिक कार्यकर्ता