राजुरा शहरातील तरुणांचा आम आदमी पक्षात प्रवेश व नियुक्ती.

राजुरा शहरातील तरुणांचा आम आदमी पक्षात प्रवेश व नियुक्ती.


एस.के.24 तास


राजुरा : आज दिनांक- २६/११/२०२३ ला राजुरा येथील आम आदमी पक्ष जनसंपर्क कार्यालयामध्ये राजुरा शहरातील तरुणांनी आम आदमी पक्षाचे कामगार जिल्हाध्यक्ष श्री.सुरजभाऊ ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. याचबरोबर श्री. रोशन बंडेवार यांची युवक शहर अध्यक्ष,राजुरा या पदी नियुक्ती करण्यात आली.


 या वेळेस तरुणांनी आम आदमी पक्षाने जे काम दिल्ली, पंजाब मध्ये करून दाखविले त्या कामाचे कौतुक करत हा एकमेव असा पक्ष आहे जो आरोग्य व्यवस्था,  शिक्षण व्यवस्था यासह जनतेच्या अत्यावश्य गरजा पूर्ण करण्याचा दृष्टिकोनातून काम करतो. तसेच राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये जे जनहितार्थ काम  आम आदमी पक्षाचे कामगार जिल्हाध्यक्ष श्री.सुरजभाऊ ठाकरे हे करतात त्या कामाला प्रेरित होऊन आज राजुरा येथील तरुणांनी आम आदमी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयांमध्ये मा श्री.सुरजभाऊ ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळेस तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.


याचबरोबर समाजसेवेसाठी नेहमी सज्ज असणारे राजुरा येथील सक्रिय तरुण श्री.रोशन बंडेवार यांची आम आदमी पक्षाच्या युवक शहर अध्यक्ष,राजुरा या पदी कामगार जिल्हा अध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.


 यावेळेस पक्षप्रवेश केलेले तरुण अमित सिंग, अमन सिंग,रीतिक बुरकुंडे,प्रणय गौरकर,तनवीर शेख, हर्षल मत्ते,दर्शन भोयर,अनिल येमुर्ले,यश शिंदे,यश सावन आदी तरुणांनी उपस्थित पदाधिकारी मा. कामगार जिल्हाध्यक्ष श्री.सुरजभाऊ ठाकरे,निखिल बजाईत, राहुल चव्हाण,महेश ठाकरे,रोशन बंडेवार यांच्या उपस्थित पक्षप्रवेश व नियुक्ती करण्यात आली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !