विकास विद्यालय अ-हेरनवरगाव येथे अपूर्व विज्ञान तथा आनंद मेळावा उत्साहात साजरा.

विकास विद्यालय अ-हेरनवरगाव येथे अपूर्व विज्ञान तथा आनंद मेळावा उत्साहात साजरा.


अमरदीप लोखंडे सहसंपादक ब्रह्मपुरी


ब्रम्हपुरी : दिनांक,२०/१२/२३ ब्रह्मपुरी तालुक्यातील विकास विद्यालय अ-हेरनवरगांव येथे " अपूर्व विज्ञान तथा आनंद मेळाव्याचे " आयोजन करण्यात आले.या मेळाव्याचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम.बी.धोटे सर यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,  गावातील प्रतिष्ठित नागरिक,पालक,विद्यार्थी  यांच्या उपस्थितीत पार पाडले.

या अपूर्व विज्ञान मेळाव्यात विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या हिरीरीने सहभाग नोंदवून दैनंदिन जीवनाला उपयोगी पडणाऱ्या व देशहितासाठी लाभदायक ठरणाऱ्या विज्ञानाच्या विविध प्रतिकृती तयार करून ठेवल्या.


विद्यार्थ्यांनी ठेवलेल्या प्रतिकृतींचे गावातील उत्साही विद्यार्थी,विद्यार्थिनी तसेच विद्यालयातील विद्यार्थी,विद्यार्थिनी,शिक्षक वृंद यांनी निरीक्षण केले.अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यालयातील शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !