विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त फळवाटप.
★ सावली शहर काँग्रेस कमिटीतर्फे ग्रामीण रुग्णालय सावली येथे फळवाटप.
एस.के.24 तास
सावली : आज सावली शहर काँग्रेस कमिटी तर्फे ग्रामीण रुग्णालय सावली येथे राज्याचे विरोधी पक्षनेते,माजी मंत्री,ब्रम्हपुरी- सावली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आद.शिवानीताई वडेट्टीवार यांच्या संयुंक्त अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्याने रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आले.
यावेळी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,माजी पंचायत समिती सभापती मा.विजय कोरेवार नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे, उपंगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार महिला शहर अध्यक्षा सौ.भारती चौधरी, न.प.बांधकाम सभापती सौ.साधना वाढई,आरोग्य स्वच्छता सभापती मा.अंतबोध बोरकर,महिला व बाल कल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे,नगरसेवक मा.प्रफुल वाळके नगरसेविका सौ.अंजली देवगडे
सौ.ज्योती गेडाम,सौ.प्रियंका रामटेके,सौ.पल्लवी ताटकोंडावार,सौ.सीमा संतोषवार,मा.प्रशांत राईंचवार,माजी ग्रा.प.सदस्या सौ.कविता मुत्यालवार,मा.निखिल दुधे,मा.किशोर घोटेकार, जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.राजू बुरीवार,सौ.शिला गुरनुले,मा.बादल गेडाम, मा.यश गेडाम आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक बहुसंख्यने उपस्थित होते.