लोकशाहीर संचाचे विदर्भात समाज प्रबोधन कार्यक्रम ; गावोगावी नागदिवाळी महोत्सव साजरा.
एस.के.24 तास
चिमुर : चिमूर तालुकातील मुग्दाई प्रेरणास्थान, डोमा येथे येथे नुकतीचा नागदिवाळी महोत्सव साजरा करण्यात आला.नागदिवाळी महोत्सवाच्या निमित्ताने आदिवासी माना समाजाच्या चालीरीती, संस्कृती पाडली जावी. इतिहास,सामाजिक समस्येची जाण, समाज संघटन व्हावे या उद्देशाने नागदिवाळी महोत्सव साजरा केला जातो.
सोबतच लोकांमध्ये फुले, शाहू, आंबेडकर,बिरसा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पेरले जावेत,देशात सध्या स्थितीत चालू असलेल्या घडामोडी, आदिवासी चे संविधानिक हक्क -अधिकार यावर प्रकाश टाकत लोकगीतं, लोकनृत्य व पथनाट्याच्या सादरीकरण मनोरंजनातून समाज प्रबोधन कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कलामंच, वरोरा संचाचे संचालक विलास चौधरी, उपसंचालक - कमलाकर कापटे, सुनील ननावरे, प्रशांत दडमल, मंगेश जीवतोडे, प्रवीण दडमल, श्रीकांत दडमल, जशी भगत, श्रुती चौधरी, अनिता नरुले, हर्षना निखाडे, सूरज राजनहिरे, रोशन हजारे व अमोल श्रीरामे या कलावंतांनी सहभाग घेतला. भंडारा जिल्ह्यातील माडगी, बघेडा, चंद्रपूर जिल्ह्यात डोमा,दिंदोडा,चोरा व भगवानपूर येथे सादरीकरण झालेत.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना,पदाधिकारी कार्यकर्ते सहकार्य करत आहेत.