आकाश धनराज सोनटक्के यांचा रेती तस्करी च्या ट्रॅक्टर ने च मृत्यु याला जबाबदार वन अधिकारीच. ■ राजु मुरकटे यांचा आरोप व तक्रार.

आकाश धनराज सोनटक्के यांचा रेती तस्करी च्या ट्रॅक्टर ने च मृत्यु याला जबाबदार वन अधिकारीच. 


■ राजु मुरकटे यांचा आरोप व तक्रार. 


एस.के.24 तास


चिमुर : वनपरिक्षेत्र एस.डी.सी.एमखडसंगी ( चिमुर ) अंतर्गत २५ / २६ नागनदी मधुन दिवस _ रात्रौ अवैध रेती तस्करी होत असुन शासनाची करोडो रुपयांची नुकसान होत आहे अशी अवैध रेती वाहतूक बंद करावी अशी तक्रार दिनांक १५ / ६ /2023 रोजी वनअधिकारी वनविभाग ' चंद्रपूर यांना राष्ट्रवादी कांग्रेसचे चिमुर तालुकाध्यक्ष राजु मुरकटे यांनी दिली होती. 


परंतु संबंधित विभागाने कोणतीच कारवाई केली नाही. म्हणुन पुन्हा दि. 3 / ७ / २०२३ रोजी ऽ D C M कार्यालय व वन मंत्रालय यांना दिली असता कोणतीच कारवाई झाली नाही. अचानक दि २० / १२ / २०२३ रोजी आकाश धनराज सोनटक्के यांना ट्रक्टरने मृत्यु झाला. सदर ट्राक्टर हि अवैध रेती तस्करी करणाऱ्या व्यक्तींचीच असुन आकाश च्या मृत्युला वनपरिक्षेत्र अधिकारी व बिट गारड जबाबदार असुन त्यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून निलंबित करावे व आकाश च्या वारसानास २५ लाख रुपये मदत घ्यावी अशी मागणी राजु मुरकटे राष्ट्रवादी कांग्रेस नेता चिमुर यांनी शासनाकडे केलेली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !