संत गाडगे बाबा पुण्यतिथी व उजेडे महाराज पुण्यस्मरण सोहळा संपन्न.

संत गाडगे बाबा पुण्यतिथी व उजेडे महाराज पुण्यस्मरण सोहळा संपन्न.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : श्री,संत गाडगे महाराज स्मारक धर्मशाळा,ब्रम्हपुरी येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी व उजेडे महाराज पुण्यस्मरण सोहळा साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी   परिसर सफाई करण्यात आली व  स्वच्छता तथा आरोग्याचा संदेश देण्यात आला. त्यानंतर संत गाडगे महाराज यांच्या मुर्तीचे पुजन व “ दलित मित्र ” चरणदास उजेडे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.


या कार्यक्रमाला गडचिरोली चिमुर लोकसभा श्रेत्राचे खासदार अशोक नेते, नगराध्यक्षा रिताताई उराडे, माजी गडचिराली जिल्हा परीषद सभापती रंजिता कोडापे, स्मीता पारधी, नगरसेवक हितेंद्र राऊत,सचिन राऊत, नामदेवराव ठाकुर, नारायणराव बोकडे, श्रीराम करंबे, सतिश डांगे, उत्तम बनकर, श्रीधर नागमोती, प्रशांत डांगे, भास्कर जांभूळकर यांच्या उपस्थीतीत पार पडला. 


मान्यवरांचे स्वागत व प्रास्तावीक शाखेचे संचालक डॉ.ललित उजेडे यांनी केले तर पाहुण्यांनी गाडगे बाबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या प्रसंगी बोबडे महाराज भजन मंडळ यांच्या सौजन्याने सुमधुर भजन तसेच गोपालकाल्याचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कमलाकर उजेडे यांनी केले. यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.यात सुमारे ३००० लोकांनी महाप्रसादचा लाभ घेतला.


हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता कमलाकर उजेडे, ज्योत्स्ना उजेडे, विहार मेश्राम, सचिन निशाने, जगदिश बावनकुडे, महेश पिलारे,  गोवर्धन दोनाडकर ,रविंद्र तुपट,  मनोहर कावळे, धनेश राखडे, गुलशन मेश्राम, मनोज शिंगाडे, मंगेश शेंडे यांनी अथक परीश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !