बाबासाहेबांना अभिवादन हिच औपचारिकता न बाळगता त्यांचे विचार निरंतर जिवंत ठेवण्याची लढाई लढणे हिच खरी त्यांना श्रध्दाजंली. - अँड.विनय बांबोळे
एस.के.24 तास
गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन हिच औपचारिता न बाळगता त्याचे विचार व आच्यार निरंतर जिवंत ठेवण्याची लढाई लढणे हिच खरी त्यांना श्रद्धाजंली ठरू शकते असे मौलीक विचार अँड.विनय बांबोळे यानी विवेकानंद नगर गडचिरोली येथील कार्यक्रमा प्रसंगी माडले.
प्रबुद्ध विहार विवेकानंद नगर व शाहु नगर येथील बुद्ध विहारात विश्वरत , बोधिसत्व परम पूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम पार पडला. यात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष गोपालजी रायपूरे,शेड्युल कॉस्ट फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.विनय बाबोळे,सामाजीक कार्यकर्त्या प्रतिभा बांबोळे आदि लाभले होते.
याप्रसंगी गोपाल रायपुरे म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कोटी कोटी उपकार आमच्यावर आहे.म्हणुन बाबासाहेबांचे स्मरण करणे महत्वाचे आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रिया निरज रामटेके यांनी तर आभार वैशाली ठाकुर हिने केले. कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.