भूमिपुत्र ब्रिगेड आणि गोंडवाना गोटूलच्या प्रतिनिधींनी पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासींवर वन प्रशासन पोलीस प्रशासन द्वारा अन्याय करण्याच्या निषेधार्थ. ★ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांना निवेदन दिले.


भूमिपुत्र ब्रिगेड आणि गोंडवाना गोटूलच्या प्रतिनिधींनी पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासींवर वन प्रशासन पोलीस प्रशासन द्वारा अन्याय करण्याच्या निषेधार्थ.


★ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांना निवेदन दिले.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


पोंभुर्णा : भूमिपुत्र ब्रिगेड डॉ.राकेश गावतुरे, राकेश मोहुर्ले आणि विक्रम गुरनुले आणि गोंडवाना गोटुल चे अक्षय कन्नाके,भरत टेकाम,किशोर कोडापे,चंदू कुमार,यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष,नानाभाऊ पाटोले यांची भेट घेतली.पोंभुर्णा पोलिसांनी तालुक्यातील आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या 35 निरपराध आदिवासी महिला व पुरुष लोकांवर दाखल केलेल्या हत्येचा प्रयत्न यांसारख्या खोट्या आणि गंभीर आरोपांच्या महत्त्वाच्या मुद्द्याला या निवेदनात संबोधित केले आहे. 


या आधी सुद्धा ऑक्टोबर मध्ये आदिवासी बांधवांनी केलेल्या आंदोलनात पोलिसांनी आणि वन प्रशासनातील लोकांनी मिळून काही आंदोलकांवर हत्येचा प्रयत्न आणि इतर गंभीर  खोटे गुन्हे दाखल केले.


वन जमिनीचे पट्टे मिळण्यासाठी तालुक्यात पेसा कायदा लागू करण्यासाठी आणि पोंभुरण्याच्या इको पार्क मधील आदिवासी महानायकांच्या प्रतिकांची विटंबना रोखण्यासाठी हे आदिवासी बांधव पोंभुरणा येथे धरण्यावर बसले होते तेव्हा त्यांच्या मागण्यांकडे लक्ष नव्हता उलट त्यांच्यावर खोटे गंभीर आरोप लावून कुणाच्या हत्येच्या गुण्यासारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले.


या कथित अन्यायाविरुद्ध भूमिका घेऊन या पीडित आदिवासी बांधवांना न्याय मिळवून द्यावा आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती प्रतिनिधींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  नानाभाऊ पटोले यांना केली. ते या आदिवासी बांधवांचा संवैधानिक अधिकार राखण्याच्या आणि निरपराध आदिवासी लोकांचे संरक्षण करण्याच्या महत्त्वावर जोर देतील याबद्दल त्यांनी आश्वाशीत केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !