अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा. - नंदकिशोर वाढई यांची मागणी.


अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा. - नंदकिशोर वाढई यांची मागणी. 


राजेंद्र वाढई - उपसंपादक


राजुरा : अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत पोहचवावी अशी मागणी ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव,अ.भा.सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस,कळमगाव नाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच,नंदकिशोर वाढई यांनी प्रशासनाकडे केली आहे. 

      

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. एका दाण्याचे हजार दाणे करणारा आमचा शेतकरी हा अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडला आहे. शेतात राबराब राबुण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरात मात्र अत्यंत अल्प मोबदला पडत आहे तोही उशिरा. शासन फक्त पंचनामे करून शेतकऱ्यांना भुलतापा देत आहे. शासनाने आदेश देऊन सुध्दा शेतकर्‍यांचे काहीच नुकसान झाले नाही असा यंत्रणेचा सुर आहे. 


परंतु प्रत्यक्षात अवकाळीने शेतकऱ्यांचा कापूस ओला झाला आहे. कापूस हा झाडावरुन खाली पडला आहे त्या कापसाची प्रत खराब झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाला भाव कमी मिळणार आहे. शेतामध्ये उभ्या असलेल्या तुरी पुर्णतः खाली जमिनीवर झुकल्या आहेत. तुरी चा फुल बार गडुन तुरी पुर्णतः काळया पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तुरी च उत्पादन फारच कमी प्रमाणात होणार आहे. मिरची चे पिक धोक्यात आले आहे.


 मिरची पुर्णतः जमिनीवर पडुन गेली आहे त्यामुळे मिरची सारखं नगदी पीक सुध्दा शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. बाकी शेतकऱ्यांचे हरभरा, गहू, भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाले आहे म्हणून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य हि भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी नाही तर अखिल भारतीय सरपंच परिषद (महाराष्ट्र राज्य) शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करुन शेतकऱ्यांना मदत मिळवून दिला शिवाय राहणार नाही असे मत स्मार्ट उपक्रमशील सरपंच कळमना तथा विदर्भ सरचिटणीस अखिल भारतीय सरपंच परिषद ( महाराष्ट्र राज्य) नंदकिशोर वाढई यांनी व्यक्त केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !