महापरीनिर्वान दिनी ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे बाबासाहेबाना अभिवादन.
एस.के.24 तास
नागभीड : भारतीय संविधान निर्माते, ज्यांना जगाने सिम्बॉल ऑफ नॉलेज अश्या शब्दात गौरविले त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले.या निमीत्ताने ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष अतुल दादाजी पांडव यांनी अभिवादन करताना मी जे काही आहे ते फक्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आहे.
संघटनेमुळे मला जी काही छोटीशी ओळख आहे ते सुधा बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आहे.यावेळी त्यांनी ' शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा ' या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला जीवन जगण्या च्या मंत्राचा पुनरुच्चार केला.
या कार्यक्रमाला गावातील प्रथम नागरिक सरपंच,अँड.सौ.शर्मिला रामटेके यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्याला आचरणात आणावे लागेल,तेव्हाच खरी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली अर्पण केल्यासारखे होईल असे सांगितले.
हया कार्यक्रमाला उपसरपंच नवेगाव पांडव विजय पंढरीनाथ बोरकुटे,मा.रितेश राजेश्वर पांडव सौ.मीराताई मशाखेत्री,सौ.निरांजनाताई सोनटक्के सौ.कल्पना सुरेश नवघडे,तसेच मा.शशिकांत रहाटे,बंन्सिलाल चुऱ्हे. दिवाकरजी नवघडे ,
मान.हरिचंद रामटेके,श्रीमती,शारदा ताई वासुदेव नवघडे,गावातील प्रतिष्ठित महिला व पुरुष मंडळी. व ग्रामपंचायत कर्मचारी विजय नवघडे,सोमेश्वर पांडव हे उपस्थित होते.ह्या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन रितेश पांडव सदस्य ग्रामपंचायत नवेगाव यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी विजय नवघडे, सोमेश्वर पांडव हे उपस्थित होते ह्या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन रितेश पांडव सदस्य ग्रामपंचायत नवेगाव यांनी केले.