ज्ञानोपासक विद्यालय,निरज येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा.

ज्ञानोपासक विद्यालय,निरज येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,१६/१२/२३ निलज येथील ज्ञानोपासक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक आज  अपूर्व विज्ञान मेळावा तसेच आनंदमेळाव्याचे आयोजन करण्यात आले.


 सर्वप्रथम भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम, गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन, व ज्ञानोपासक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बबनराव ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन ज्ञानोपासक मंदिर शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष शीला ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.


या मेळाव्यामध्ये तेरा वैज्ञानिक प्रयोग व प्रकृतीचे तसेच टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ आणि आकर्षक वस्तूचे प्रदर्शन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. त्याच प्रमाणे या आनंदमेळामध्ये विद्यार्थ्यांनी विविध खाण्याचे पदार्थांचे स्टाल लावले होते. सदर आनंद मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी निरुपा शिक्षण संस्था रुई, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निलज, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रुई, तसेच रूई निलज पाचगाव येथील ग्रामस्थांनी आस्वाद घेतला.


 या मेळाव्यात अव्वल ठरलेल्या तीन प्रयोग तीन उत्कृष्ट कलाकृती बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. याप्रसंगी संस्था सदस्य सुधीर बोबडे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष मनोज तिजारे, सचिव ज्ञानेश्वर बोरुले सदस्य रामचंद्र शेलोकर,ज्ञानेश्वर ठाकरे,प्राचार्य डी एम चौधरी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत भावे मानले..तर प्रास्ताविक एम बी कार यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षिका व इतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !