वाघाच्या हल्यात गुराखी जखमी डोनाळा येथील घटना.

वाघाच्या हल्यात गुराखी जखमी डोनाळा येथील घटना.


एस.के.24 तास


सावली : सावली वनपरिक्षेत्राअतर्गत व्याहाड खुर्द उपवन परीक्षेत्रातील उपरी बिटातील डोनाळा जंगलात वाघाच्या हल्यात गुराखी जखमी झाल्याची घटणा काल शुक्रवारी सायंकाच्या सुमारास घडली तुळशिराम देवाजी पिपरे ६५ वर्षे असे जखमीचे नाव आहे तुळशिराम पिपरे हा गुरे चारुन सायंकाळी ५ वाजता च्या दरम्यान जंगलातुन घराकडे परत येत असताना वाघाने त्यांचेवर हल्ला केला अगडी गावाजवळ घटना घडल्याने आरडाओरड ऐकुन गावकरी धावल्याने गुराखी जखमी अवस्थेत दिसुन आले त्यावेळी गुराखी तुळशिराम पिपरे यांना घरी आणुन हि माहिती वनरक्षक सोनेकर यांना दिले.


असता सोनेकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात गडचिरोली येथे हलविण्यात आले आठ दिवसांपूर्वी कढोली मार्गावर वाघ रस्ता ओलांडताना वाहन चालकानी वाहने उभी करुन चित्रीकरण केले होते असे असताना देखील वनविभागाचे दुर्लक्ष होताना दिसुन येत आहेत. त्वरीत वन विभागांनी दखल घेवुन वाघांचा बंदोबस्त करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस युवा ता अध्यक्ष किशोर कारडे यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !