यशस्वीतेसाठी रम,रमा,रमी पासून दूर रहा. !
■ " शिक्षण यात्रा " निमित्त अँड,दीपक चटपचे प्रतिपादन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२५/१२/२३ " आपल्याकडचा विद्यार्थी हा बहुगुणी आहे परंतु त्याला अनेक बाबी माहित नसल्यामुळे तो वंचित राहला आहे.परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी शासनाच्या अनेक शिष्यवृत्ती योजना असून त्याचा लाभ ग्रामीण होतकरु विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.विद्यार्थांनी अनेक पातळ्यांवर ज्ञानग्रहण करावे.आपल्या यशस्वीतेसाठी रम,रमा,रमीपासून मात्र दूर रहावे." असे प्रतिपादन अँड दीपक चटपांनी केले.नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात प्राचार्य डॉ डी एच गहाणेंच्या मार्गदर्शनाखाली नुकताच कार्यक्रम घेण्यात आला.
विचारपीठावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख कवी डॉ धनराज खानोरकर होते तर प्रमुख उपस्थितीत कवी अविनाश पोईनकर, पत्रकार राहुल मैंद,पर्यवेक्षक प्रा.आनंद भोयर, डॉ वर्षा चंदनशिवे,प्रा. बालाजी दमकोंडवार, प्रा.निलिमा रंगारी आदी मान्यवर उपस्थित होते.
अँड दीपक चटपांविषयी आणि जिल्हात ' संविधान दिन ते गणराज्य दिन ' पर्यंत काढलेल्या 'शिक्षण यात्रा 'मोहिमेविषयी कवी अविनाश पोईनकरांनी प्रास्तावेत उत्स्फूर्तपणे माहिती दिली.आपल्या अध्यक्षीय भाषणात कवी डॉ खनोरकरांनी, विद्यार्थ्यांनी कलाशिक्षण व जीवनशिक्षणाकडे लक्ष द्यावे.विद्यार्थी हा ज्ञानकेंद्री असावा,तो वर्गात रोज दिसावा आणि जे जे उन्नत त्या ठिकाणी तो बसावा.असे काव्यमय वर्णन करुन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा.बालाजी दमकोंडवारांनी केले.यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य करुन कार्यक्रमाची शोभा वाढविली.