बामसेफ चे अधिवेशन नागपूर येथे सुरु बामसेफ चे ४० वे व भारत मुक्ती मोर्चा चे १३ राष्ट्रीय अधिवेशन.
■ तलमले वाडी पारडी नागपूर येथे दिनांक २४ ते २८ डिसेंबर ला संपन्न.
एस.के.24 तास
गडचिरोली : बामसेफ चे ४० वे व भारत मुक्ती मोर्चाचे १३राष्ट्रीय अधिवेशन तलमले वाडी पारडी नागपूर येथे दिनांक २४ ते २८ डिसेंबर ला संपन्न होत आहे.या अधिवेशनात भारतातून दहा लाखाच्या वर लोक उपस्थित झाले.या अधिवेशनात प्रमुख मार्गदर्शक बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष,वामन मेश्राम आहेत.या अधिवेशनात भारतात सध्या बहुजनावर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात विविध समस्यावर मार्गदर्शन व चर्चा करण्यात येत आहे.
या अधिवेशनाच्या माध्यमातून बहुजन समाजाने आपल्यावर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध लढा लढण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.सध्या प्रस्थापित सरकारने बहुजन समाजाला गुलाम करण्यासाठी न्यू एज्युकेशन पॉलिसी, ईव्हीएम,खाजगीकरण,आरक्षण नष्ट करणे,डिलीस्टिंग अशा समस्या निर्माण केले आहे.
त्याचप्रमाणे धर्मवाद वाढवून हिंदू मुस्लिम मध्ये वाद निर्माण करून मनुवाद पक्का करण्याच्या प्रयत्न करीत आहे.म्हणून या देशातील बहुजन समाजाने जागृत होऊन आपले हक्क व अधिकार मिळवून घेण्यासाठी संघर्ष केल्या पाहिजे.अशा वेगवेगळ्या विषयावर बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष,वामन मेश्राम यांनी मार्गदर्शन केले.
या अधिवेशनाला गडचिरोली जिल्ह्यातून भोजराज काणेकर,शांतीलाल लाडे,प्रमोद राऊत कूंदा तोडकर ,प्रमोद बांबोळे, रमेश मडावी, नरेश बांबोडे,यज्ञराज जनबंधू, नागेश वाट,इंदिरा गोंगले,डोमाजी गेडाम ,निकिता निमसरकार, प्राध्यापक अशोक वंजारी,मोहन गोंगले ,प्रभाकर करमे,संगीता करमे,अमित नगराळे, प्रकाश गौतम,मनोज खोब्रागडे,यज्ञराज जनबंधू , नंदकिशोर दुर्गे,लीला दुर्गे,योगिता खोब्रागडे,राजेंद्र लाकडे,राजेंद्र मडावी, इत्यादी एक हजार च्या वर कार्यकर्ते उपस्थित आहेत.