माजी विद्यार्थाने माजी शिक्षकांचा केला सत्कार.
एस.के.24 तास - गडचिरोली
गडचिरोली : मरणाच्या दारात पोहचणाऱ्या माझी शिक्षकांचा माझी विद्यार्थ्यांनी सत्कार केल्यामुळे आमचे १० वर्ष आयुष्य वाढविले. प्रा. जगदिश म्हस्के. गडचिरोली १0 ते १५ वर्ष सेवानिवृत्त होणारे माजी शिक्षक जे आता मरणाच्या दारापर्यंत पोहचणार अश्या शिक्षकांचा माझी विध्यार्थीनी आमचा सत्कार करून १० वर्ष पुन्हा आमचे आयुष्य वाढविले असे हे आमचे विध्यार्थी जे आता मोठ्या हुद्यावर नोकरीवर असुन तेही नातवापतवाचे धनी आहेत.
त्यांच्या सत्कारामुळे आम्ही भारावून गेलोत असे उद्गार माजी प्राचार्य जगदिश म्हस्के यांनी सत्काराला उत्तर देताना काढले. शिवाजी हायस्कुल गडचिरोली चे १९९७ च्या बाँच चे माजी विधार्थी आरमोरी रोडवरील हाय फॉर्म गोगाव लॉन मधे शिक्षक - विद्यार्थी व पालक स्नेहमिलन सोहळा आयोजीत केला होता.यात प्रा. जगदिश म्हस्के , प्रा. पुरुषोत्तम निकोडे ' प्रा. मुनिश्वर बोरकर , प्रा. पि.पी. म्हस्के, ए. टि. म्हशाखेत्री , अरविंद बळी , सुमतीताई मुनघाटे आदि माजी शिक्षकांचा सत्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी मुनिश्वर बोरकर म्हणाले की, माझी विध्यार्थाचा आम्ही शाळेत सत्कार करतो परंतु माझी विद्यार्थांनी माझी शिक्षकांचा सत्कार म्हणजे हा एक अफलातून आनंददायी प्रकारच म्हणावे लागेल. आम्ही शिक्षकच , परंतु आमचे विध्यार्थी कुणी डॉक्टर ' इंजिनिअर , ठेकेदार ' व्यापारी तर कुणी राजकीय क्षेत्रात चमकले यांचा आम्हाला अभिमान वाटतो. याप्रंसगी पि.पी म्हस्के, प्रा. निकोडे , बळी सर यांचेही समायोचित भाषणे झालीत.
यावेळी अजय दिवेदी , दिनेश आकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचलन अमोल दशमुखे यांनी तर आभार सुधिर चौधरी यांनी मानले. कार्यक्रमास माजी शिक्षक , विध्यार्थी व त्याचे पालक अमरावती वरून अनिल वाघ , नागपूर चे अजय दिवेदी अर्चना कत्रोजवार,मोहीत दशमुखे यांनी स्वागत गित गाऊन बहुसंख्येने उपस्थित होते.