तालुका स्तरावर सरपंचांसाठी सभागृह द्या : आ. सुभाष धोटेंना नंदकिशोर वाढईं ची निवेदनाद्वारे मागणी.



तालुका स्तरावर सरपंचांसाठी सभागृह द्या : आ. सुभाष धोटेंना नंदकिशोर वाढईं ची निवेदनाद्वारे मागणी. 


राजेंद्र वाढई - उपसंपादक


राजुरा : पंचायत राज व्यवस्थेचा ग्रामपंचायत हा महत्त्वाचा कणा आहे. सरपंच हा गावच्या विकासासाठी आवश्यक घटक आहे. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो त्याच प्रमाणे गावचा प्रमुख हा सरपंच असतो. सरपंचांना तालुका स्तरावर ग्राम पंचायत कामानिमित्त ये जा करावी लागते.मात्र पंचायत समितीला आल्यानंतर त्याला बसण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध नाही.


 त्याला कुठेही बसून कामे करावी लागतात. सरपंचांना सभा, बैठक, घेण्यासाठी पंचायत समिती स्तरावर सरपंच सभागृहाची नितांत गरज आहे. सरपंचांना आप आपसांत समन्वय साधण्यासाठी हक्काचे सभागृह आवश्यक आहे. ग्रामपंचायत च्या अनेक व योजना ह्या पंचायत समिती मार्फत राबविल्या जातात. 


ग्राम विकासाच्या अनेक योजना केंद्र व राज्य स्तरावरुन ग्राम पंचायत ला येत असतात. या सर्वात महत्त्वाचा दुवा पंचायत समिती असते. म्हणून सरपंच सभागृह पंचायत समिती स्तरावर असणें फार गरजेचे आहे ही बाब लक्षात घेऊन कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी आमदार सुभाष धोटे यांची भेट घेऊन याविषयी चर्चा केली, निवेदन देऊन पंचायत समिती स्तरावर सरपंच सभागृह मंजुर करुन द्या अशी मागणी केली आहे. 


या प्रसंगी माजी उपसरपंच महादेव ताजणे, गुरुदेव सेवा मडळ कार्यकर्ते सुरेश गौरकार उपस्थित होते तर पंचायत राज अभ्यासक तथा ग्रा.पं.सदस्य बाबुराव मडावी, सरपंच जयपाल आत्राम,सरपंच शंकर आत्राम, सरपंच पांडुरंग पोटे, उपसरपंच रामभाऊ ढुमणे, सरपंच वर्षा बोरकुटे, सरपंच शुभांगी आत्राम, सरपंच लक्ष्मी पोरशेट्टी यासह सर्व सरपंच व उपसरपंच यांनी या मागणीस पाठिंबा दिला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !