गोवंश तस्करी 35 जनावरांसह 3 आरोपी वर कारवाई.

गोवंश तस्करी  35 जनावरांसह 3 आरोपी वर कारवाई.


एस.के.24 तास


सावली : गडचिरोली कडून मुल कडे कत्तलीसाठी गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनाचा सावली पोलिसांनी पाठलाग करीत 35 जनावरांना ताब्यात घेत 3 आरोपींना अटक केली. गोवंश तस्करीच्या अनेक कारवाया ठाणेदार,आशिष बोरकर यांनी केल्या आहेत. 


   गडचिरोली वरून मुलकडे एका ट्रक मधून रात्री 12:00 वाजता दरम्यान अवैध गोवंश वाहतूक होणार अशी गोपनीय माहिती मिळाली असता सापळा रचून संशयित ट्रक MH.40.CM 2614 थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये 35 गोवंश जनावरे क्रूरपणे तोंडाला मोरके व दोर बांधलेले दिसून आले. 


मिळून आलेले 35 जनावरे व बारा चाकी टाटा ट्रक किंमत असे मिळून एकूण 15,50,000 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रक चालक व आरोपी शेख जाकीर शेख मेहबूब, इर्शाद उल्लाह खान किस्मत उल्ला खान दोन्ही रा.मुर्तीजापुर जिल्हा अकोला, मोहसीन अली मोबीन अली रा.आकोट जिल्हा अकोला यांचेवर संबंधित विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


सदरची कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार आशिष बोरकर यांचे नेतृत्वात सावली पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल विशाल दुर्योधन, रामदास कोंडबत्तूवार,संजय शुक्ला, पो.शि.चंद्रशेखर गंपलवार,विजय कोटणाके यांनी केली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !