भगवानपूर येथील,गंगाराम फेबुलवार वाघाच्या हल्ल्यात ठार ; तीन दिवस होते बेपत्ता.
★ हातातील राखी मुळे पटली ओळख.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
गडचिरोली : तालुक्यात नरभक्षक वाघांनी धुडगूस घातला असून एका पुरुषाचा बळी घेतल्याच्या घटना शुक्रवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली.भगवानपूर मध्ये धान राखणी साठी गेलेल्या शेतकऱ्यास हल्ला करून ठार केले.
गंगाराम कवडू फेबुलवार वय,५५ रा.भगवानपूर ता.जिल्हा,गडचिरोली यांची जंगला लगत धान शेती आहे. त्यांचा मुलगा व पत्नी नागपूर ला राहतात.गंगाराम हे दिवाळी मध्ये धानाची राखण करण्यासाठी गावी आले होते.
अचानक तीन दिवसांपासून ते बेपत्ता झाले.गावातील नागरिकांना ते नागपूर ला गेले असावेत,असा समज होता.कुटुंबातील मुला सोबत संपर्क केला प्रयत्न केला तेव्हा फेबुलवार हे बेपत्ता असल्याचे लक्षात आले. जंगलात शोध मोहीम राबविली तेव्हा डोक्याच्या कवटी चा भाग व हाताचे पंजे आढळून आले.त्यांच्या हाताला राखी बांधली होती.त्या वरून त्यांची ओळख पटली.