भंडारा जिल्हा कारागृहात वाचनालयाचे उद्घाटन.
नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी,भंडारा
भंडारा : भंडारा जिल्हा कारागृह वर्ग-१, येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष राजेश गो. अस्मर, यांचे हस्ते दि.7नोव्हेंबर 2023 रोजी वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या वाचनालयाचे उदघाटन पश्चात कारागृहातील आरोंपीकरिता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष राजेश अस्मर यांनी मार्गदर्शन करतांना कैद्यांना पुस्तक हे जीवनामध्ये अत्यंत आवश्यक बाब आहे.
कैद्यांनी फावल्या वेळी पुस्तक वाचायला सांगुन पुस्तकापासून चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. कारागृहातून सुटल्यानंतरपण या पुस्तकांपासून मिळविलेल्या चांगल्या गोष्टी आपल्या मुलांना सांगून त्यांना सुध्दा पुस्तक वाचायला सांगावे. तसेच त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण देवून वाचाल तर वाचाल असे सांगीतले.
आपल्या प्रास्ताविक भाषणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सचिव बिजू बा.गवारे यांनी वाचन आणि लेखन वर्तन बदल घडऊ शकते की ज्यामुळे जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणला जावू शकते असे विचार व्यक्त केले . वाचनालय उद्घाटनासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,राजेश अस्मर यांचे योगदान लाभले म्हणुन आभार व्यक्त केले.
त्याचप्रमाणे सर्व न्यायाधीश, मुख्य विधी सेवा सल्लागार भारत बी. गभणे, वकील संघ तसेच जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य ढोमणे राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी चे भांडारकर यांचे ग्रंथालयात लागणा-या पुस्तकांकरिता योगदानाबद्दल आभार व्यक्त केले. तसेच बंदयांनी पुस्तकांचा चांगला वापर करून ज्ञानार्जन करावे असे सांगितले.
या कार्यक्रमाचे संचालन मुख्य विधी सेवा संरक्षण अधिवक्ता, भारत गभने तसेच आभार जिल्हा कारागृह वर्ग-१,अधीक्षक,डि.एस.आडे यांनी केले. या कार्यक्रमात जिल्हा कराागृहातील बंदी मोठया संख्येने उपस्थित होते.