रॉयल्स युवा मंच अ-हेरनवरगाव येथे महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतिदिन " शिक्षक दिन " म्हणून साजरा.

रॉयल्स युवा मंच अ-हेरनवरगाव येथे महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतिदिन " शिक्षक दिन " म्हणून  साजरा.


अमरदीप लोखंडे,सहसंपादक.


ब्रम्हपुरी : दिनांक,२९/११/२३ सत्यशोधक

समाजाचे निर्माते महात्मा ज्योतिबा फुले हे " शिक्षक दिनाचे " खरे मानकरी समजून रॉयल्स युवा मंच अरे नवरगाव यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला आणि त्यांना विनम्र अभिवादन केले आणि तालुक्यात एक नवीन पायाभरणीला सुरुवात केली.

सदर कार्यक्रमाप्रसंगी रॉयल्स युवामंच तर्फे कोणत्याही सामाजिक कार्यक्रमाला विनामूल्य भोजन तयार करून देणारे दाम्पत्य श्री राजेश्वरजी ठेंगरे व शोभाबाई ठेंगरे यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रशांत जी राऊत उद्घाटक सुभाष ठेंगरे माजी सैनिक यांच्या हस्ते धोतर, साडी, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


तसेच नुकताच २०२३ ला महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार प्राप्त श्री अमरदिप लोखंडे यांचे अ-हेर नवरगाव च्या सरपंचा सौ दामिनी ताई चौधरी यांच्या शुभहस्ते श्री,वामनरावजी मिसार यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 


महात्मा ज्योतिबा फुले या स्मृतिदिन शिक्षक दिन कार्यक्रमाचे उद्घाटक माजी सैनिक सुभाषजी ठेंगरे,  सहउदघाटक ईश्वरजी कुथे तर अध्यक्ष पत्रकार प्रशांत राऊत हे होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री,वामानजी मिसार काँग्रेस किसान सेल अध्यक्ष,अरे नवरगाव ग्रामपंचायत च्या सरपंचा प्रथम नागरिक सौ.दामिनीताई चौधरी,संजयजी ठेंगरे बग्रामपंचायत सदस्य,अनिल मदनकर बाबुसाहेब,दुर्योधन ठेंगरे तंटामुक्त अधक्ष अ.न.अनिल बगडे,सुहास राऊत, मोतीराम जनबंधू डॉ.नाजूकराम खंडाईत,विनायक बागमारे व इतर मान्यवर उस्थितीत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत राऊत तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक,एस.के.24 तास चे सहसंपादक पत्रकार अमरदिप लोखंडे,यांनी कार्यक्रमा प्रसंगी उपस्थितांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकून शिक्षणाचे महत्त्व सांगितले.आणि आपल्या मुलांना शिक्षण द्या व मुलांना शिकवून सत्यशोधक मार्गाचा अवलंब करा असे  मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन व आभार प्राध्या.रोशन मदनकर यांनी केले.  रॉयल्स युवामंच अ-हेर नवरगाव यांचा म.फुले स्मृतिदन निसर्गाची अवकृपा असतानाही मोठ्या उत्साहात जनतेने सहकार्य करून पार पाडला.महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केल्याबद्दल सर्व स्तरातून रायल युवा मंच चे कौतुक केल्या जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !