३१ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.चंद्रकांत लेनगुरे यांची निवड.
एस.के.24 तास
गडचिरोली : झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय समिती साकोलीच्या वतीने नियोजित ३१ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते गडचिरोली येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ.चंद्रकांत लेनगुरे यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय समितीच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक बंडोपंत बोढेकर यांनी डॉ.लेनगुरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करून गडचिरोली जिल्हा शाखेच्या सभेत मानवस्त्र,श्रीफळ व ग्रामगीता देऊन सत्कार केला.
या प्रसंगी गडचिरोली जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष डॉ.प्रवीण किलनाके,कवी,पुरुषोत्तम ठाकरे,श्रीमती प्रतीक्षा कोडापे, कवी उपेंद्र रोहनकर,सौ.गीता लेनगुरे,सौ.रजनी बोढेकर, कोषाध्यक्ष,मारोती आरेवार तसेच आदींची उपस्थिती होती.
येत्या दि. १६ व १७ डिसेंबर २०२३ रोजी सदर झाडीबोली साहित्य संमेलन बामनी (खडकी) ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया येथे होत आहे.
डॉ.चंद्रकांत लेनगुरे गेल्या पंधरा वर्षापासून झाडीबोली साहित्य मंडळाच्या साहित्य चळवळीत कार्यरत असून त्यांची आजवर पाच पुस्तके प्रकाशित झालेली आहे. चंद्रगीत (२००२), वनव्यातील झाडं (२००६), गाव रामायण (२०२०) चंद्राशी चक्कलस ( २०२१), झाडी बोलीतील झाडीचा गोंदा (२०२०) ही लेखनकृती त्यांच्या नावावर असून गझल कविता,
चारोळ्या आणि ग्रंथ समीक्षण क्षेत्रात ते सदैव विहार करीत असतात. साहित्य क्षेत्रातील आजवर त्यांना २४ पुरस्कार मिळालेले आहे.मौशीखांब येथे संपन्न झालेल्या २७ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे ते प्रमुख संयोजक होते.
निवड झाल्याबद्दल केंद्रीय समितीचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर,एड.लखनसिंह कटरे,आचार्य ना.गो.थुटे,डॉ.राजन जयस्वाल,कवी राम महाजन,डोमा महाराज कापगते,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष,अरूण झगडकर,गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.विनायक धानोरकर,सचिव कमलेश झाडे,सहसचिव संजीव बोरकर,गोंदिया जिल्हा प्रमुख पवन पाथोडे,भंडारा जिल्हा प्रमुख कुंजीराम गोंधळे तसेच मंडळाच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केलेले आहे.