रागनगर पोलिस स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार,नरेश डाहुले याचा रात्रीस खेळ चाले ; दिवसा पोलीस,रात्रौ चोर. ★ अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

रागनगर पोलिस स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार,नरेश डाहुले याचा रात्रीस खेळ चाले ; दिवसा पोलीस,रात्रौ चोर. 


★ अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.


एस.के.24  तास


चंद्रपूर : सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना येथे गेलेल्या मुस्तफा रमजान शेख यांच्या घराचे कुलूप फोडून कपाटात ठेवलेली रोख रक्कम चोरून नेली.या घटनेचा तपास करणाऱ्या रागनगर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार नरेश डाहुले याला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.शेअर बाजारात पैसे बुडाल्याने पोलिस हवालदाराने ही चोरी केल्याचे सांगण्यात येत आहे.


मुस्तफा रमजान शेख यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की,त्याचा भाऊ इरफान हा मातोश्री शाळेच्या मागे असलेल्या तुकूम येथे आपल्या कुटुंबासह राहतो. ९ नोव्हेंबर च्या संध्याकाळी ते मक्का आणि मदिना येथे गेले.


 दरम्यान त्याला घर सांभाळण्यास सांगण्यात आले. मुस्तफा शेख यांनी १३ नोव्हेंबर रोजी भावाच्या घरी जाऊन झाडांना पाणी दिले असता सर्व काही ठीक असल्याचे दिसून आले.मात्र १५ नोव्हेंबर रोजी इरफान शेख यांची मुले रेहान व नवाज हे नागपूरहून चंद्रपूर येथील त्यांच्या घरी पोहोचले असता मुख्य दरवाजाचे कुलूप मात्र तुटलेले दिसले. 


त्यांनी मुस्तफा शेख यांना फोनवरून माहिती दिली असता त्यांनी घरात चोरी झाल्याचे पाहिले.त्यांच्या तक्रारीच्या आधारे रामनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्यां विरुद्ध कलम ३८०,४५४ आणि ४५७ नुसार गुन्हा दाखल केला.


या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी शनिवारी रात्री बंगाली कॅम्पमध्ये राहणारे गुन्हे शाखेचे हवालदार नरेश डाहुले याला अटक केली. नरेश डाहुले हा घरफोडी मध्ये सहभागी असल्याचा संशय पोलिसांना असल्याने त्याच्या वर नजर होती,असे सांगण्यात येते.कारण या आधी ही त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला सावध केले होते.


या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाने शुक्रवारी रात्री नरेशला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.या प्रकरणी रामनगर पोलीस तपास करत आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पोलीस हवालदाराच्या अटकेला दुजोरा दिला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !